न.पा.तील सफाई कामगार महिलांचा सत्कार

फाऊंडेशनच्या वतीने जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन नगरपरिषदेतील सफाई।। कामगार महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. भडगाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ज्या खऱ्या अर्थाने मेहनत घेतात, एकअर्थाने त्यांच्या कार्याचाच हा गौरव झाला. तसेच राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त कु. निशा दिलीप पाटील हिचा देखील सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सत्कार सभारंभाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा…

Details

मिनी मॅरॉथॉन

फाऊंडेशन तर्फे एक अभिनव उपक्रम म्हणुन मिनी मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी फाऊंडेशनने ही संकल्पना मांडली. यात भडगाव शहरात असलेल्या शाळांतील मुला-मुलींची मिनी मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित केली. यात ५ वी ते १० वी या इयत्तेत शिकणाऱ्या मुला-मुलींचे ४ गट करून ही स्पर्धा घेण्यात आली. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांचे बक्षिस प्रत्येक…

गुणगौरव

फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या कॉलेजच्या विद्यार्थी-

विद्यार्थीनींना, शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तक देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी, डॉ. रविंद्र सुरडकर, देवेंद्र पाटील, दिनेश तांदळे सर, योगेश शिंपी सर, सुशिल महाजन सर, संजय सपकाळे व सागर सुर्यवंशी हे उपस्थित होते.

 

 

भाऊबिज

येथील मुलांचे आई-वडील, भाऊ-बहिण, नातलग परिवार नसल्याकारणाने दिवाळीतील भाऊबिज हा सण या मुलांसोबत फाऊंडेशनच्या जया सपकाळे, डॉ. पल्लवी सुर्यवंशी, पल्लवी पाटील, भाग्यश्री पाटील यांनी त्यांना ओवाळून साजरा केला. या प्रसंगी देवेंद्र पाटील, सुशिल महाजन हेदेखील उपस्थित होते.

 

 

मिठाई वाटप

फाऊंडेशन तर्फे वाक येथील निवासी वसतीगृहातील (अनाथआश्रम) मुलांना कौटुंबिक जिव्हाळा मिळावा व भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण दिवाळी हा सण त्यांना देखील साजरा करता यावा व त्यांना आनंदाचे काही क्षण मिळावे यासाठी त्यांच्यासोबत दिवाळीच्या दिवशी फराळ वाटप करून घालविण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत फाऊंडेशनचे सुजित दुडे, समिर सुर्यवंशी, सागर सुर्यवंशी, देवेंद्र पाटील, दिपक सुर्यवंशी, विशाल पाटील…

स्वच्छता अभियान

फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाची संकल्पना फाऊंडेशनचे डॉ.रविंद्र सुरडकर यांनी मांडली. त्यांनी सुचविल्याप्रमाणे स्वच्छता अभियानाची आखणी करण्यात आली. अभियानात सहभागी होणेसाठी गावातील स्वयंसेवक, महाविद्यालय, शाळा येथे परिपत्रक, जाहीरात करण्यात आली. ज्या परिसरात अभियान राबवायचे होते तेथील जनतेला एक दिवस आगोदर स्वच्छते संबंधी माहीती देण्यात आली. माहीती देण्याचे काम योगेश शिंपी सर, अजित…

Cleanliness Drive Campaign

“Cleanliness Keeps Most Of Diseases Away “ On Occasion of Mahatma Gandhi Jayanti Mauli Foundation is organizing cleanliness drive as part of Swachh Bharat Mission, India. Mauli Foundation volunteers will take part in this campaign and with the help of residents clean area around Yashwant Nagar Bhadgaon. Mauli Foundation Volunteers will also explain importance of cleanliness to…

बाल आरोग्य तपासणी शिबीर

फाऊंडेशन तर्फे रोकडा फार्म येथे बाल आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीरात १ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गावातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. त्यांनी आपल्या मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली. फाऊंडेशन तर्फे या शिबीरात तज्ञ डॉक्टरांना आमंत्रीत केले. डॉ. हेमंत गांगोलिया (मुंबई), डॉ. संगिता गांगोलिया (मुंबई), डॉ. हेमंत शेवाळे, डॉ.…