19Jul2016

वृक्षारोपन म्हणजे झाडे लावणे असा साधा आणि सरळ विचार लोक करतात. परंतु नुसते झाड लावून उपयोग होत नाही तर त्याचे संगोपनही तेवढेच महत्वाचे असते. ते जगवने, त्याची काळजी घेणेही महत्वाचे असते. या सर्व गोष्टींचा विचार करून वृक्षारोपनाचा निर्णय फाऊंडेशन तर्फे घेण्यात आला.

At भडगाव शहर

भडगाव शहर

फाऊंडेशन तर्फे भडगाव शहर व परिसरात वक्षारोपनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपन म्हणजे झाडे लावणे असा साधा आणि सरळ विचार लोक करतात. परंतु नुसते झाड लावून उपयोग होत नाही तर त्याचे संगोपनही तेवढेच महत्वाचे असते. ते जगवने, त्याची काळजी घेणेही महत्वाचे असते. या सर्व गोष्टींचा विचार करून वृक्षारोपनाचा निर्णय फाऊंडेशन तर्फे घेण्यात आला. फाऊंडेशन तर्फे समग्र असा विचार करण्यात आला. भारतीय वातावरणात जगणारी वनस्पती, ती भारतीय जातीची असावी येथील पशु-पक्षी यांना उपयोगी असावी, त्याचा भविष्य काळात उपयोग व्हावा या गोष्टींचा देखील येथे विचार करण्यात आला. त्यासाठी नगर येथून देशी वृक्ष आणण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर येथील पानसरे नर्सरी येथुन खास नांदुक, शतपर्णी, बेल, बहावा, कवट, रूद्राक्ष अशा प्रकारच्या झाडांची रोपे आणण्यात आली. त्यांना आवश्यक खते देखील आणण्यात आली. वृक्ष लावल्यानंतर त्यांची निगा राखण्यासाठी झाडांच्या भोवती जाळीचे कंडे लावण्यात आले. झाडांना पाणी देणेकामी फाऊंडेशनचे कार्यकर्ते नेहमी पाहणी करीत असतात.

या वृक्षारोपनाचा शुभारंभाप्रसंगी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रसंगी प्रशांत पवार ( नगराध्यक्ष, न. पा., भडगाव), सुनिल देशमुख (माजी नगराध्यक्ष, भडगाव), शामकांत पाटील (उपनगराध्यक्ष ), मा. श्री. झा साहेब (मॅनेजर, बँक ऑफ बडोदा, शाखा भडगाव), श्री. विजय देशपांडे (समाजिक कार्यकर्ते, भडगाव), जाकीर कुरेशी (सामाजिक कार्यकर्ते, भडगाव), डॉ. प्रमोद पाटील (लिलावती हॉस्पीटल, भडगाव), डॉ. मधुकर सोनवणे, प्रविण वाणी, बबलु देवरे, किरण काकडे (बाहक निरीक्षक, यस स्टैंड, भडगाव), डॉ. अशोक ओस्तवाल, किरण राठोड, इम्रान सैय्यद, भैय्या भोसले, नाना चौधरी, गजानन पाटील यांनी उपस्थित राहुन वृक्षारोपन केले. याकामी युवराज सुर्यवंशी (उपाध्यक्ष), अजित दुडे, सुजित दुडे, महेश पोतदार, देवेंद्र पाटील, सागर सुर्यवंशी, बबन सुर्यवंशी व सर्व फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांनी यासाठी परिश्रम घेतले.

 

 

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

clear formSubmit