फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाची संकल्पना फाऊंडेशनचे डॉ.रविंद्र सुरडकर यांनी मांडली. त्यांनी सुचविल्याप्रमाणे स्वच्छता अभियानाची आखणी करण्यात आली. अभियानात सहभागी होणेसाठी गावातील स्वयंसेवक, महाविद्यालय, शाळा येथे परिपत्रक, जाहीरात करण्यात आली.
At भडगाव, ता. भडगाव
भडगाव, ता. भडगाव
फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाची संकल्पना फाऊंडेशनचे डॉ.रविंद्र सुरडकर यांनी मांडली. त्यांनी सुचविल्याप्रमाणे स्वच्छता अभियानाची आखणी करण्यात आली. अभियानात सहभागी होणेसाठी गावातील स्वयंसेवक, महाविद्यालय, शाळा येथे परिपत्रक, जाहीरात करण्यात आली. ज्या परिसरात अभियान राबवायचे होते तेथील जनतेला एक दिवस आगोदर स्वच्छते संबंधी माहीती देण्यात आली. माहीती देण्याचे काम योगेश शिंपी सर, अजित दुडे, देवेंद्र पाटील, सागर सुर्यवंशी यांनी केले. याद्वारे जनजागृती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियानाला सुरवात करण्यात आली. यात वर सांगितल्याप्रमाणे स्वयंसेवक, कॉलेजमधील तरुण-तरुणींनी, शाळातील मुला- मुलींनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दिली होती. यशवंत नगर हा भडगाव शहरातील टोणगाव वस्तीतील एक भाग जेथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तेथील रस्ते, गटारी, कचरा कुंड्यातील घाण साफ करण्यात आली. वस्तीतील लोकांना साबणाचे वाटप करण्यात आले. त्यांच्या घरातील पिण्याच्या पाण्यात जीवनड्रॉप टाकण्यात आले. अशा प्रकारे संपुर्ण स्वच्छता व आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे लोकांना पटवून देवून हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी, अजित दुडे, योगेश शिंपी, सुशिल महाजन, महेश पोतदार, नगरसेवका योजना पाटील, कमलताई अहिरे, नगरसेवक संतोष महाजन, डॉ. स्वप्नील पाटील, जाकीर कुरेशी, पत्रकार संजय पवार, सुधाकर पाटील, विशाल पाटील, किरण राठोड, महेंद्रसिंग राजपुत, अजय चौधरी, रवि पाटील, प्रविण चव्हाण, रितेश पाटील, रवि बेहरे, सुनिल पगारे, गजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या अभियानात महिला व युवतींचा सहभाग हा लक्षणिय होता यात पल्लवी पाटील, गायत्री पाटील, संयुक्ता थडकर, ऐश्वर्या परदेशी, वर्षा क्षिरसागर, भाग्यश्री पाटील, प्रियंका शिंपी, अंजली पाटील, देवयानी पाटील, संजिवनी पाटील परिश्रम घेतले. या अभियानात मोलाचे सहकार्य लाभले ते वस्तीतील रामा गौंड, गोकुळ गौंड, दादु गाँड भुषण गौंड, अभिषेक गौंड, जैकी गौंड, निलेश गौंड, देवा परदेशी यांचे. तसेच एकनाथ पाटील, विशाल परदेशी, हर्षल पाटील, ऋषिकेश शिंपी, आकाश पाटील, अविनाश शिंपी, कल्पेश शिंपी या विद्यार्थ्यांनी या मोहीमेत सहभाग नोंदविला.