फाऊंडेशनच्या वतीने जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन नगरपरिषदेतील सफाई।। कामगार महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. भडगाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ज्या खऱ्या अर्थाने मेहनत घेतात, एकअर्थाने त्यांच्या कार्याचाच हा गौरव झाला.
At ता. भडगाव
ता. भडगाव
फाऊंडेशनच्या वतीने जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन नगरपरिषदेतील सफाई।। कामगार महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. भडगाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ज्या खऱ्या अर्थाने मेहनत घेतात, एकअर्थाने त्यांच्या कार्याचाच हा गौरव झाला. तसेच राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त कु. निशा दिलीप पाटील हिचा देखील सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सत्कार सभारंभाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. सुवर्णा शामकांत पाटील ह्या होत्या तसेच श्रीमती. गुंताबाई सुर्यवंशी, सौ. योजनाताई पाटील (नगरसेविका), सौ. लताताई पाटील ( सामाजीक कार्यकर्त्या), डॉ. शिल्पा पाटील, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. स्मिता महाजन, सौ. मंगलाबाई सुर्यवंशी, सौ. लक्ष्मीबाई सुर्यवंशी, सौ. वैशाली शिंदे, सौ. रंजना पाटील, सौ. प्राजक्ता देशमुख, वडजीच्या सरपंचा प्रतिभा वाघ या उपस्थित होत्या.
या प्रसंगी फाऊंडेशनचे कार्यकत्यांसोबत श्री. विजय देशपांडे (सामाजिक कार्यकर), डॉ. प्रमोद पाटील, डी. एच. तांदळे सर, जोसेफ मरसाळे यांची विशेष उपस्थिती दिली. या प्रसंगी जोसेफ मरसाळे (ठेकेदार, सफाई कामगार) यांनी आपले मनोगत मांडले व या सत्कार सभारंभाच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त केले.