फाऊंडेशन तर्फे एक अभिनव उपक्रम म्हणुन मिनी मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी फाऊंडेशनने ही संकल्पना मांडली. यात भडगाव शहरात असलेल्या शाळांतील मुला-मुलींची मिनी मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित केली.
At भडगाव
भडगाव
फाऊंडेशन तर्फे एक अभिनव उपक्रम म्हणुन मिनी मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी फाऊंडेशनने ही संकल्पना मांडली. यात भडगाव शहरात असलेल्या शाळांतील मुला-मुलींची मिनी मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित केली. यात ५ वी ते १० वी या इयत्तेत शिकणाऱ्या मुला-मुलींचे ४ गट करून ही स्पर्धा घेण्यात आली. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांचे बक्षिस प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आले. विजेत्यांना मेडल, सर्टिफिकेट देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी भडगावचे मा. तहसिलदार सो., भडगाव पोलीस स्टेशनचे पी.आय. सो. उपस्थित होते.
प्रा. श्री. दिनेश तांदळे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण मॅरॉथॉनचे नियोजन केले. फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री. युवराज सुर्यवंशी, देवेंद्र पाटील, योगेश शिंपी सर, सुशिल महाजन सर, समीर सुर्यवंशी, संजय सपकाळे, विशाल पाटील, सागर सुर्यवंशी, डॉ. पल्लवी सुर्यवंशी, भाग्यश्री पाटील, कविता महाजन व फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्त्ये यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. स्वप्नील पाटील व डॉ. पल्लवी सुर्यवंशी यांनी स्पर्धेत सहभागी मुला-मुलींच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली.