फाऊंडेशन तर्फे रोकडा फार्म येथे बाल आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीरात १ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गावातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
At रोकडा फार्म, ता. भडगाव
रोकडा फार्म, ता. भडगाव
फाऊंडेशन तर्फे रोकडा फार्म येथे बाल आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीरात १ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गावातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. त्यांनी आपल्या मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली. फाऊंडेशन तर्फे या शिबीरात तज्ञ डॉक्टरांना आमंत्रीत केले. डॉ. हेमंत गांगोलिया (मुंबई), डॉ. संगिता गांगोलिया (मुंबई), डॉ. हेमंत शेवाळे, डॉ. अलका शेवाळे, डॉ. निलेश महाजन, डॉ. स्मिता महाजन, डॉ. रविंद्र सुरडकर, डॉ. प्रल्हाद महाजन यांनीबालकांची तपासणी केली.
लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करणे कामी सर्व तपासण्या ह्या मुंबईच्या थायरोकेअर
पॅथॉलॉजी मधुन करण्यात आल्या. खास प्रशिक्षीत तज्ञांकडून मुलांचे रक्तांचे नमुने घेण्यात आले. व त्यांचे रिपोर्ट हे तेथील पॅथॉलॉजीमधुन मागविण्यात आले. त्यानुसार प्रत्येक बालकाला ट्रिटमेंट देण्यात आली. त्यांना प्रोटीन, व्हिटामीन असलेली औषधी पुरविण्यात आली. आवश्यक त्यांना पुढील उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. या प्रसंगी मनोहर सुर्यवंशी (अध्यक्ष), युवराज सुर्यवंशी (उपाध्यक्ष), समिर सुर्यवंशी, सागर सुर्यवंशी, निखिल महाजन, समीर सुर्यवंशी, बबन सुर्यवंशी, दिपक मराठे सर, अजित दुडे, महेश पोतदार, योगेश शिंपी, हरसिंग पाटील, उल्हास पाटील, गजेंद्र पाटील, दिपा सुर्यवंशी, पल्लवी सुर्यवंशी, जया सपकाळे, स्वाती रंधे, पल्लवी पाटील व फाऊंडेशनचे कार्यकर्ते
उपस्थित होते.