मोफत जलसेवा - पाणपोई (२२ एप्रिल २०१६) फाऊंडेशन तर्फे भडगाव येथे मोफत जलसेवा सुरू करण्यात आली. हनुमान जयंतीचे औचित्य साधुन जलसेवेचे लोकार्पण केले.
At ता. भडगाव
ता. भडगाव
फाऊंडेशन तर्फे भडगाव येथे मोफत जलसेवा सुरू करण्यात आली. हनुमान जयंतीचे औचित्य साधुन जलसेवेचे लोकार्पण केले. जलसेवेचे उद्घाटन श्री. मयुर जैन ( रोहन कलेक्शन, भडगाव) यांच्या हस्ते करण्यात आले तर श्री. महेश साहेब (उपशाखाधिकारी बँक ऑफ बडोदा,शाखा भडगाव) यांनी प्रतिमा पुजन केले. याप्रसंगी श्री. युवराज सुर्यवंशी (उपाध्यक्ष, माऊली फाऊंडेशन), श्री. अजित दुडे, श्री. नाना चौधरी, सुजित दुडे, महेश पोतदार, राहुल पाटील, संजय सपकाळे व फाऊंडेशनचे कार्यकत्यें उपस्थित होते. भडगाव बस स्टैंड परिसरात पारोळा चौफुली येथे ही सेवा सुरू करण्यात आली. या वर्षी पाण्याची भिषण टंचाई त्यात कडक उन्हाळा अश्या परिस्थितीत लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे प्रचंड हाल लक्षात घेवुन फाऊंडेशन तर्फे पाणपोईची संकल्पना मांडली व त्यानुसार एप्रिल महिन्यात पाणपोईची सुरूवात केली. लोकांना शुद्ध थंडगार पाणी मिळणेसाठी पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आले. दिवसाला २५ ते ३० जार अशा पद्धती जवळपास २ ते अडीच महिने हा उपक्रम राबविण्यात आला. भडगाव हे तालुक्याचे ठिका असल्याकारणाने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाश्यांना या उपक्रमाचा खुपच लाभ झाल पाणपोईचे ठिकाण हे प्रवाशी थांब्याजवळ असल्याकारणाने रिक्षा चालक, काली पिली चालक अश्या रोज प्रवाश्यांची वाहतुक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला झाला त्याचबरोबर प्रवाशीही या पाणपोईने सुखावत होते. पाणपोईची श्री. देवेंद्र पाटील व सागर सुर्यवंशी य दोघांनी व्यवस्था बघितली. पाणपोईच्या निर्मीतीकामी श्री. महेश पोतदार व श्री. अजित दु यांनी विशेष परिश्रम घेतले. फाऊंडेशच्या कार्यकत्यांनी वेळोवेळी आवश्यक त्या सर्व गोष्टींसाठी मदत केली.